बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता शिगेला लागली आहे.दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी नव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावे,अशी मनोभावे प्रार्थना श्रींच्या चरणी केली आहे.
महाराष्ट्रात महायुतीला रेकॉर्डब्रेक बहुमत मिळालं आहे. निकाल २३ नोव्हेंबरला लागलाय. मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ? हा सस्पेन्स अद्याप कायम आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे.एकनाथ शिंदे ही रेसमध्ये आहेत. दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना गजानन महाराजांनी शक्ती द्यावी आणि त्यांच्या मुखातून एकनाथ शिंदे यांचेच नाव मुख्यमंत्री म्हणून यावे,यासाठी श्रींच्या चरणी गायकवाड यांनी साकडे घातले आहे.आमदार संजय गायकवाड यांचा श्रद्धेवर विश्वास असून, त्यांनी आज स्थानिक विष्णू वाडी परिसरातील गजानन महाराज यांची आरती करून एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत या साठी साकडे घातले आहे.
आज सकाळी अकरा वाजता त्यांनी संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची आरती केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच झाले पाहिजे, यासाठी गजानन महाराज चरणी साकडे घातले आहे.