बुलढाणा (हॅलो बुलडाणा) निष्क्रियता व गद्दारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांना भोवली आहे. अवघ्या 3 महिन्यात मी गावोगावी पोहचलो नव्हतो परंतु कार्यकर्ता व जनतेने ‘दो आँखें बारा हाथ’ करून मला विजयी केल्याचे मेहकर विधानसभा मतदारसंघातील उद्धव सेनेचे विजयी उमेदवार सिद्धार्थ खरात म्हणाले.शिवाय त्यांनी विविध प्रश्नावर विकास करणार असून ‘लोणारचे लोणावळा’ करणार असल्याची ग्वाही दिली.
मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी 3 पंचवार्षिक आमदार राहिलेले महायुतीचे उमेदवार डॉ. संजय रायमुलकर यांचा पराभव केलाय. मेहकर विधानसभा मतदारसंघ हा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला मानला जातो. तर या ठिकाणी संजय रायमुलकर हे 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. परंतु, यावेळेस मंत्रालयीन कामकाजाचा 30 वर्षांचा अनुभव असलेले, राज्य सरकारचे माजी अधिकारी सिद्धार्थ खरात यांनी रायमुलकरांचा पराभव केला आहे. डॉ संजय रायमुलकर यांच्या पदरात मतदारांनी 99423 मतं टाकली, तर सिद्धार्थ खरात यांना 104242 मतदारांनी भरभरून मते दिली आहे. त्यामुळंच सिद्धार्थ खरात यांचा 4819 मतांनी दणदणीत विजय झालाय. ही निवडणूक जनतेनं हाती घेतलेली होती. त्यामुळंच माझा विजय झाला”, अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ खरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली.दरम्यान ती म्हणाले की,माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी गळ्यात उमेदवाराची माळ टाकल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो शिवाय महाविकास आघाडीची अभेद्य मोट उभी राहिली.त्यांना मी संघटित करू शकलो.आणि हा झालेला विजय कार्यकर्ता व जनतेचा आहे.येणाऱ्या काळात मतदारसंघातील रखडलेला विकास करणार आहे.शेतकऱ्यांची कर्जमाफी व इतरही शेतकऱ्यांची विकासात्मक मुद्दे शिवाय बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी एमआयडीसी निर्माण करणार असून लोणार चे लोणावळा करणार असल्याचेही सिद्धार्थ खरात म्हणाले.