बुलढाणा (हॅलो बुलडाणा) घड्याळावर निवडून येणाऱ्यांच्याच ‘हृदयाचे ठोके’ वाढविणारी चुरशीची लढत सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाली असून नवख्या उमेदवाराने दिग्गज नेत्याच्या ‘तुतारीला’ बूच लावले आहे. त्यामुळे घड्याळ सोडून तुतारी हातात घेऊन फुंकणाऱ्याच्या डोक्यात मात्र आता पाच वर्ष ‘टिक टिक वाजत राहील’ असे विरोधकांकडून म्हटले जात आहे.
डॉ.राजेंद्र शिंगणेंनी 25 वर्षे नुसतं जातीय राजकारण केलं.मंत्रीपदावर असूनही विकास कामशुन्य झाली. निवडून आले की पाच वर्ष मतदारसंघाकडे बघायचे नाही. विकास करायचा नाही. नुसतं जातीवादी राजकारण करायचं आणि नागरिकांना भ्रमात पाडायचं असंच काही सिंदखेड विधानसभा मतदारसंघात पक्ष बदलणाऱ्या डॉ. शिंगणे यांनी केल्याचा आरोप त्यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांनी केला होता.त्या तर निवडणुकीत तोंडघशी पडल्याच परंतू जायंट किलर ठरलेल्या मनोज कायंदे यांनी येथे विजयाचा इतिहास रचला आहे.
या आधी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी 5 वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले. ते 1999 पासून 4 वेळा घड्याळ चिन्हावर विजयी झालेत. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाची दोन शकले झाल्याने डॉ. शिंगणे यांनी जिल्हा बँकेसाठी 300 कोटी रुपये मिळणार असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच पक्ष बदलून राष्ट्रवादी शरद पवार गटात घरवापसी केली. दरम्यान सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात डॉ. शिंगणे ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हावर उभे राहिले.मात्र निवडणूक होण्यापूर्वी या तुतारीचा स्वर मंदावल्याचे अनेक वेळा ‘हॅलो बुलढाणा’ने प्रकाशित केले होते. त्यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांनी देखील राजेंद्र शिंगणे यांच्यावर अनेक आरोप केले होते.राजेंद्र शिंगणे मंत्रीपदावर असताना देखील 25 वर्ष विकास करू शकले नाहीत असा स्वर आवळला गेला.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात उभे ठाकलेले महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मनोज कायंदे महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतील जायंट किलर ठरले.महायुतीच्या डॉ.शशिकांत खेडकर यांना मात देत राजेंद्र शिंगणे यांना मनोज कायंदे यांनी धूळ चारली. ही हार डॉ.शिंगणे यांची नामुष्की करणारी ठरली आहे.














