देऊळगांवराजा (हॅलो बुलडाणा/ संतोष जाधव) स्व. देवानंद कायंदे यांचे गेल्या अनेक दशकापासून काँग्रेस पक्षासोबत जुळलेले राजकीय नाते व स्व. देवानंद कायंदे यांच्या मृत्यूनंतर लगेच काही दिवसात विधानसभेचे बिगुल वाजले विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर निवडणूक लढविण्यासाठी काय निर्णय घ्यावा…? यासाठी कायंदे परिवारा समोर मोठा पेज निर्माण झाला होता. निवडणूक लढण्यासाठी कुठलीही तयारी नसताना अगदी वेळेवर मनोज कायंदे यांनी भारतीय काँग्रेस पक्षाला राम राम ठोकत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार गट ) घड्याळ या चिन्हाचा ए.बी. फार्म घेऊन निवडणुकीत उतरले. गेल्या पंचवीस वर्षांपासून सत्तेत असलेले विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या समोर निवडणूक लढण्याचे मोठे आवाहान नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांच्या पुढे होते. परंतु नेता नव्हे मित्र मनोज कायंदे सर्वत्र या टॅग लाईन खाली शेवटच्या टप्प्यात प्रचारात त्यांनी आघाडी साधली. गांव तिथे मतदान घेण्यात ते यशस्वी ठरले. सुरुवातीला काही फेऱ्यात मनोज कायंदे हे 8/ 10 हजार मतांनी मागे होते. परंतु शेवटच्या फेऱ्यात मनोज कायंदे यांनी अगदी 1500 मतांची आघाडी घेत ती शेवट पर्यंत 4000 हजार मतांच्या पुढे जाऊन विजयाचा लीड कायम ठेवलाय. 25 व्या फेरी अंती मनोज कायंदे यांना 72 हजार 256 मते, तर दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे डॉ.राजेंद्र शिंगणे यांना 67 हजार 553 व तिसऱ्या क्रमांकावर डॉ शशिकांत खेडेकर यांना 59 हजार 838 मते मिळाली आहे.मनोज कायंदे यांचा विजयी घोषित होताच सिंदखेड राजा माँ जिजाऊंच्या नगरीत विजयी रॅली काढण्यात आली. तर ठीक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. हा विजय सिंदखेड राजा मतदार संघातील सर्व मतदार बांधवाचा असल्याचा भावना मनोज कायंदे यांनी ‘हॅलो बुलडाणा’शी बोलतांना व्यक्त केल्या.