बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दारू पिऊन वाहन चालविणे गुन्हा आहे. हे पोलीस प्रशासनाला चांगल्या पद्धतीने माहीत असूनही समृद्धी महामार्गावर वाहक दारू पिऊन वाहने चालवितात त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. पोलिसांची थातूरमातूर कारवाई होत असते. अशी कारवाई 20 जून रोजीही विशेष तपासणी मोहिमेत झाली. 42 वाहनांची तपासणी करून फक्त एका वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 20 जून रोजी राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत 42 वाहनांची तपासणी सिंदखेड राजा समृध्दी टोल नाका वर करण्यात आली त्यापैकी दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या 01 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून पर्यायी चालकाची व्यवस्था करे पर्यंत वाहने सुरक्षितरित्या पार्क करण्यात आली. तसेच 03 प्रवासी बस वर कारवाही करण्यात आली.
सदर मोहिमेत मोवानी सीमा खेते मॅडम, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सुरज कोल्हे, स्वप्निल वानखेडे, राधिका चव्हाण हजर होते. परंतु प्रश्न असा की समृद्धी महामार्गावर ठिकठिकाणी हॉटेल्स, पानपट्टी वर दार उपलब्ध आहे. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.