spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! पराभवाची दाट छाया! डॉ.रायमुलकर यांच्या अकलेचे दिवाळे निघाले! -सिद्धार्थ खरातच निवडून येणार,समर्थकांचा दावा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांना ‘मुंबईचे पार्सल’ संबोधल्याने सिद्धार्थ खरात म्हणाले की, रायमुलकर यांना पराभवाची चाहूल लागली असून त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आणि हास्यास्पद विधान करून मतदारांना संभ्रमात पाडण्याचे काम रायमुलकर करीत आहे,अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ खरात यांनी दिली आहे.

सध्या मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असे युद्ध रंगत आहे.(शिवसेना शिंदे गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) दरम्यान एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत.रायमुलकर यांनी सिद्धार्थ खरात यांना मुंबईचे पार्सल म्हणून टार्गेट केले.तर विजय निश्चित असल्याने सिद्धार्थ खरात यांनी डोक्यावर बर्फ ठेवून आणि तोंडात साखर ठेवून असे म्हटले की,रोजगारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.मी मूळ ताडशिवनीचा आहे.लहानाचा मोठा येथे झालो.नोकरी निमित्त आधी तहसीलदार झालो.नंतर मंत्रालयीन सचिव पदापर्यंत मजल गाठली.आता मला लोणार मेहकर विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे. मेहकर लोणार मध्ये माझे योगदान सर्वश्रुत आहे.प्रत्येकाला सहकार्य करण्याची माझी भावना आहे. यापूर्वी देखील शेतकरी व शेतमजुरांसाठी खूप कार्य केलेले आहे.परंतु विरोधक विशेष म्हणजे आमदार रायमुलकर यांनी कुठलाच विकास केलेला दिसत नाही.मतदारांनी मला संधी दिल्यास मतदारसंघाचा चेहरा मोहरा निश्चितच बदलवून टाकणार असेही खरात म्हणाले.दरम्यान सिद्धार्थ खरातच निवडून येणार असा दावा समर्थकांनी केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!