बुलढाणा ( हॅलो बुलढाणा) डोक्यावर बर्फ तोंडात साखर ठेवली तर जग जिंकता येते. मात्र अती केली तर माती होऊ शकते. सांगायचे कारण की, उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांना शिवराळ भाषा चांगलीच भोवणार आहे.
‘आम्ही गांडूची औलाद नाही,उद्या आघाडी होईल किंवा नाही होईल.. असे सांगताना उबाठा जिल्हा प्रमुखाने महाविकास आघाडीलाच डिवचले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलाच परिणाम दिसून येईल अशी चर्चा आहे.
बुलढाणा लोकसभेत महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी दारुण पराभव केला आणि आज ते केंद्रीय राज्यमंत्री झाले आहे.लोकसभा निवडणुकीनंतर बुलढाणा येथील गर्दे सभागृहात शिवसेना उबाठाचा कार्यकर्ता मेळावा तसेच नवनिर्वाचित खासदार व पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांचा सत्कार 20 जुनला दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला होता.यावेळी जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी आपल्या भाषणात जाहीररीत्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागत निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला.पुढे बोलतांना ते म्हणाले की अनेक लोक म्हणायचे उद्या महाविकास आघाडी होईल का?युती होईल का??अरे आम्ही गांडूची औलाद नाही,गांडीला पाय लावून पळणारे नाही,उद्या जे होईल ते होईल,अशा प्रकारे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्याकडून महाविकास आघाडीलाच डीवचण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाला चांगलाच परिणाम भोगावा लागणार असल्याची चर्चा सुरू आहे.