spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! आमदार श्वेता महाले यांच्या पित्यांची प्राचार्यांना शिवीगाळ व धमकी! -श्वेता महाले यांच्या पित्यांची दडपशाही कुठवर चालेल?म्हणाले… पोलिसांच्या खिशात! -अशा भाजपाच्या आमदारांचा पराभव निश्चित!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मोठमोठ्या विकासाच्या गप्पा ठोकणाऱ्या चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता ताई महाले यांची दडपशाही कशी आहे ते शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ.पी एस वायाळ यांनी चव्हाट्यावर आणली असून त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.आमदार महाले यांचे वडील अवधूतराव पडघान यांनी

निवडणूक काळात देखील दडपशाही जारी ठेवली.’पोलीस आमच्या खिशात आहे असा त्यांनी प्रत्यय दिला. दरम्यान नातेवाइकांनाही न सोडणारे इतरांना काय सोडणार? आणि काय निवडणूक जिंकणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिवाजी शिक्षण संस्था चिखलीचे कार्यकारीणी सदस्य प्राचार्य.डॉ पि.एस. वायाळ यांना निवडणुक काळात आमदार पित्याची धमकी मिळाल्याचे वास्तव समोर आले आहे. प्राचार्य.डॉ पि.एस. वायाळ म्हणाले, शाळेचे नवीन बांधकाम झाल्याने भिंतीवर कोणीतरी पेंटिंग करत होते.शाळेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे आमची जबाबदारी होती म्हणून ही पेंटिंग थांबविण्यासाठी आम्ही नगरपालिकेमध्ये तक्रार दिली.
काम थांबले परंतु आमदार श्वेता महाले यांचे वडील अवधूतराव पडघान यांनी फोन करून, त्यांनी अश्लील शिवीगाळ केली शिवाय धमकी सुद्धा दिली आहे.मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला हा इलेक्शन काळ असून चार दिवसात संपून जाईल परंतु त्यांनी ऐकले नाही ‘तुम्हाला 20 तारखे नंतर पाहून घेईल पोलिस आमच्या खिशात आहे’ अशी आणखी धमकी दिल्याने त्यांच्या या कृत्याचा निषेध करीत असल्याचे प्राचार्य.डॉ पि.एस. वायाळ म्हणाले.त्यामुळे श्वेता ताई महाले यांच्या बॅकग्राऊंडचा
कु- परिचय सर्वांना झाला असून, त्यांची निवडणूक धोक्यात सापडली असून,दडपशाही करणाऱ्या उमेदवाराला कोण निवडून देणार ही चर्चा सर्वत्र रंगत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!