जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांची विधानसभा निवडणुकीतील शक्तीपुढे थेट लढत देणाऱ्या डॉ.संजय कुटे यांची शक्ती कमी जाणवू लागली आहे.प्रशांत डिक्कर यांनी प्रचारात घेतलेली आघाडी व त्यांना मिळत असलेला मतदारांचा प्रतिसाद पाहता डिक्करयांचा विजयीरथ प्रस्थापित सुद्धा रोखू शकणार नाही अशी प्रतिपादन राजे छत्रपती संभाजी यांनी 17 नोव्हेंबर च्या जाहीर सभेत केले.
जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील लढतीचे चित्र हळूहळू स्पष्ट होत असून परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांची महायुतीचे आ.डॉ. कुटे यांच्या सोबत लढत होणार आहे. प्रशांत डिक्कर प्रस्थापितांच्या विरोधात असून प्रचारात मारलेली मुसंडी व त्यांना बहुसंख्य सर्वसामान्य मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता एकंदरीत त्यांची विजयाकडे घौडदौड सुरू असल्याचे आजही पहावयास मिळत आहे.त्यामुळे प्रशांत डिक्कर यांना मताधिक्यांनी निवडून आणावे असे आवाहन
राजे छत्रपती संभाजी यांनी केले आहे. राजेंनी जळगाव (जामोद)येथील सभा गाजविल्यानंतर परत 15 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद ते संग्रामपूर -वरवट मार्गे शेगाव महा रॅलीला उपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला आहे. परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर मतदार संघातील गाव-गाव पिंजून काढत आहेत. प्रचार दरम्यान महिला भगिणींकडून त्यांचे औक्षण करून पुष्प पाकळ्यांचा वर्षाव करुन विजयाचा आशिर्वाद देत आहेत. तर सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी जिवाचे रान करीत आहेत. निवडणूक निधी म्हणून त्यांना गोरगरीब शेतकरी ,शेतमजूरांसह सर्व स्तरातून देणगी मिळत असल्याने प्रशांत डिक्कर हे मतदारांच्या पसंतीला उतरले असल्याचे दिसून येत आहेत.