सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) निवडून आले की पाच वर्ष मतदारसंघाकडे बघायचे नाही. विकास करायचा नाही. नुसतं जातीवादी राजकारण करायचं आणि नागरिकांना भ्रमात पाडायचं असंच काही सिंदखेड विधानसभा मतदारसंघात आजी-माजी आमदारांनी केलं आहे.त्यामुळे जोपर्यंत नहा चेहरा येत नाही तोपर्यंत परिवर्तन शक्य नाही असे विचार गायत्री शिंगणे यांनी व्यक्त केले.त्या पत्रकारांशी बोलताना संवाद साधत होत्या.
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात शिंगणे विरुद्ध शिंगणे सामना चांगलाच रंगात आला आहे.काका पुतणी यांच्या या सामन्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव न घेता गायत्री शिंगणे यांनी डॉ.शिंगणे यांच्यावर निशाणा साधला.त्या म्हणाल्या की,सरकारने त्यांना मंत्रीपद बहाल केले इतरही पद असताना त्यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचा हवा तेवढा विकास केलेला नाही.विकासा संदर्भातील माहिती अधिकार द्वारे माहिती मागितली असता तेही राजकीय दबावापोटी मिळालेली नाही. त्यामुळे सिंदखेडराजा मतदार संघातील जनता नाराज आहे.गेल्या पंचवीस वर्षापासून मतदार संघात जातीयवादी राजकारण सुरू असून हे दुर्दैवी आहे.जातीवादी राजकारण केवळ निवडणुकांमध्येच येते त्यानंतर हे नेते सत्तेत मश्गुल होतात.परंतु माझा विकासाचा मास्टर प्लॅन असून मतदारांची मला प्रचंड पसंती असल्याचे गायत्री शिंगणे म्हणाल्या.