बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलडाणा शहरात आ.संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रचाराने नवीन वळण घेतले आहे. ईकबाल चौक परिसरातील लहान चिमुकल्यांनी आपल्या निष्पाप उत्साहाने प्रचाराला वेग दिला आहे. या बालकांनी स्वतःचा प्रचाररथ तयार करून गल्लोगल्ली फिरत “ना जातीचे, ना धर्माचे, संजुभाऊ सर्वांचे!” अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला आहे.
बच्चापार्टीच्या या अनोख्या प्रचार रथाने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधले असून, त्यांच्या ऊर्जेने आणि उत्साहाने लोकांमध्ये नवा उत्साह निर्माण केला आहे. या चिमुकल्यांमध्ये अल्तमश, अयान, अली, अनास, अबू बकर, उमर, नबील, अरान, आणि अली यांचा समावेश आहे. त्यांनी संजुभाऊ गायकवाड यांचे कार्य आणि विचार पुढे नेण्यासाठी हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात आ. गायकवाड यांनी या चिमुकल्यांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि त्यांचे कौतुकही केले. त्यांच्या मते, ही पुढची पिढी सामाजिक ऐक्याचा संदेश देत आहे आणि जात-धर्माच्या पलीकडे जाऊन समाजाला एकत्र आणत आहे.
“संजुभाऊ सर्वांचे” हे वाक्य या चिमुकल्यांच्या कृतीतून सार्थ ठरत असल्याचे दिसत आहे. परिसरात हा अनोखा प्रचार जनतेमध्ये चर्चा आणि प्रेरणेचा विषय ठरला आहे.