बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील ईकबाल चौक परिसरात आज, 16 नोव्हेंबर 2024 रोजी संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रचारार्थ भव्य सभा पार पडली. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून गायकवाड यांचा प्रचंड उत्साहाने स्वागत करण्यात आले.’संजूभाऊ’ तुम आगे बडो! हम तुम्हारे साथ है! या घोषणेने संपूर्ण इकबाल चौक गाजले
सभेला मुस्लिम समाजाच्या बांधवांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. ढोलताशाच्या निनादात आणि फुलांच्या वर्षावात गायकवाड यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजाने आ.संजय गायकवाडांना विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पाठवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
सभेत महायुतीच्या विविध पक्षांचे प्रमुख नेते, शिवसैनिक, पदाधिकारी तसेच माता-भगिनी आणि मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेच्या माध्यमातून गायकवाड यांना सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाची पुन्हा एकदा पोचपावती मिळाली असून, त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला.