बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळालाच नाही.
केंद्रात आणि राज्यात भाजपा शिंदे सरकार असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशीला भाव देऊ शकले नाहीत. उलट खाद्यतेल,दाळ, गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल होऊन
कर्जबाजारी झाला.सत्ताधारी लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या हितासाठी कोताही निर्णय घेत नाहीत.फक्त कोरड्या घोषणांचा पाऊस पडला जातो. मात्र एक वेळ महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा,
राज्यात मविआचे सरकार सत्तेवर आल्याबरोबर सोयाबीन, कपाशीला ज्यादा
भाव मिळून देऊ,असे आश्वस्त करीत उबाठा शिवसेना गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ खरात यांचा जोरदार प्रचार दौरा सुरू आहे. सिद्धार्थ खरात हे आश्वासक चेहरा असल्याने आणि त्यांनी रखडलेल्या मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे अभिवचन दिल्याने ते प्रबळ उमेदवार समजले जात आहेत.तर दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी संजय रायमुलकर यांच्याबाबत मतदारसंघात नाराजीचा सूर असून यंदा मशाल पेटणार असल्याची चिन्ह आहेत. दरम्यान सिद्धार्थ खरात यांनी यापूर्वी हजारो शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे वाटप करून त्यांची जगणे समृद्ध केले आहे. आता शेतकरी, बेरोजगर,लोणार पर्यटन विकास असे अनेक मुद्दे त्याहाताशी धरून विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे.शिवाय सत्ताधारी व लोकप्रतिनिधी सोयाबीन कपाशीला जास्त भाव मिळवून देण्यासाठी अपयशी ठरल्याने मला संधी दिल्यास, सोयाबीन व कपाशीला योग्य हमी भाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचे खरात म्हणाले आहेत.