बुलढाणा (हॅलो बुलढाणा)दहवा आंतरराष्ट्रीय योग दिन बुलडाणा येथे योग प्रात्यक्षिके करून साजरा करण्यात आला. या निमित्ताने आरोग्य सुदृढतेचा
संदेश अधोरेखित करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षेगारच्या मैदानावर कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड , जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील,जिल्हा परिषदेच्या सीईओ कुलदिप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी शेलार यांनी दिपप्रज्वलन केले.. यावेळी योग प्रशिक्षक अंजली परांजपे आणि संतोष लहासे यांनी योगाच महत्व विषद करून सुदृढ निरोगी आयुष्यासाठी नियमित योग करा .. नियमित योग केल्यास आपला आरोग्य सुदृढ आणि सशक्त राहण्यास मदत होईल.. याबद्दल मार्गदर्शन केले.. यावेळी युगाचे वेगवेगळे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये बुलढाणा शहरातील विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच योग संस्थाचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते ..