मोताळा (हॅलो बुलडाणा) महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचारासाठी आज एक भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे विशेष आकर्षण म्हणजे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे उपस्थित राहणार आहे. ही सभा दुपारी २ वाजता स्वामी समर्थ मंगल कार्यालय, मोताळा येथे होणार आहे.
महाविकास आघाडीच्या अधिकृत महिला उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जनतेला केले आहे. त्यांनी सांगितले की, ही सभा महाविकास आघाडीच्या विकासात्मक धोरणांवर प्रकाश टाकेल तसेच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाची बांधिलकी पुन्हा अधोरेखित करेल.
या सभेत जनतेसाठी विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असून जयश्रीताई शेळके यांच्या कार्याचा आढावा सादर केला जाणार आहे. नाथाभाऊंच्या अनुभवाचा व घट्ट संबंधाचा फायदा विश्वासातल्या जयश्रीताईंना मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास जनता जनार्दन व्यक्त करत आहेत.
महाविकास आघाडीच्या या प्रचार सभेची परिसरात उत्सुकता असून नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.