चिखली (हॅलो बुलडाणा) येत्या २० नोव्हेबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचाराने गती घेतली असून कॉंग्रेस व मविआ चे अधिकृत उमेदवार राहुलभाऊ बोंद्रे यांनी थेट ग्रामीण जनतेशी संवाद साधून प्रचारात मुसंडी मारल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.२९ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्या पासून राहुलभाऊ बोंद्रे यांनी चिखली मतदार संघातील ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात जाऊन गावकऱ्याच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या आहे यात गावोगावी राहुभाऊच्या होण्याऱ्या मिरवणुक सभा व प्रचार सभांना ग्रामीण जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांना मिळणारा मतदाराचा प्रतिसाद व समर्थकाची मिळणारी साथ पाहता एकंदरीत राहुल बोंद्रेची विजयाकडे वाटचाल सुरु झाली असल्याचे बोलल्या जात आहे.
चिखली विधानसभा मतदार संघा मध्ये अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी पासून मतदाराकडून कॉंग्रेस व मविआ चे अधिकृत उमेदवार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या विजयावर शिक्का मोर्तब केल्या जात आहे.गत दोन दिवसा पासून राहुलभाऊ बोंद्रे यांनी धाड रायपुर सर्कल मधील धाड,सातगाव म्हसला ,मौजे धामणगाव, सावळी, रुइखेड मायंबा,सैलानी आदी गावांसह ग्रामीण परिसर गाव दौऱ्यात पिंजून काढला आहे. या गाव भेटी दौऱ्यात शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट तथा कॉंग्रेस व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा तथा महिला वर्ग मोठ्या हिरिरीने प्रचार करतांना दिसून येत आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघातील मौजे सातगाव म्हसला धाड,मौजे धामणगाव, सावळी, रुइखेड मायंबा,सैलानी येथे प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दौऱ्यात स्थानिक गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाच्या आवश्यकतांची माहिती घेण्यात आली. गावकऱ्यांनी त्यांच्या दैनदिन जीवनातील व शेतीविषयक समस्यांवर चर्चा केली, तसेच शालेय व आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविल्या आणि गावकऱ्यांना त्यांच्या हक्कांबाबत यावेळी राहुलभाऊ बोंद्रे यांनी जागरूक केले.या प्रसंगी प्रत्येक खेड्यातून ग्रामीण मतदारांचा राहुल बोंद्रे यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी गावोगावी महिला भगिनी कडून राहुलभाऊ बोंद्रे यांचे उत्स्फुर्तपणे स्वागत व औक्षण करण्यात येत आहे तर उपस्थित गावकऱ्यानी २० नोव्हेबर रोजी कॉंग्रेस व मविआ चे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या ‘हाताचा पंजा’ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.असे आव्हान राहुलभाऊ बोंद्रे यांच्या कडून करण्यात येत आहे