बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एक नव्हे तर तब्बल 32 गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला बुलढाणा एलसीबी व नांदेड जिल्ह्यातील वजीराबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सदर गुन्हेगाराने पोलिसांवर तलवारीने हमला करून फरार झाला होता.
पोलीस सूत्रानुसार,31 ऑगस्ट 2024 रोजी रात्री सराईत गुन्हेगार मनोज सिंगसिकंदर सिंग टाक राहणार म्हाडा कॉलनी, मलकापूर जिल्हा बुलढाणा याने हातातील धारदार तलवारीने त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला केला होता.जीव घेण्या हल्ल्याच्या अनुषंगाने पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता. यावेळी हा गुन्हेगार फरार झाला होता. याप्रकरणी मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हेगार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हेगाराचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता.
या गुन्हेगाराला अटक करण्यासाठी विश्व पानसरे पोलीस अधीक्षक, बुलढाणा, अशोक थोरात अपोअ. खामगांव, बी. बी. महामुनी अपोअ. बुलढाणा यांनी मार्गदर्शन करुन आदेशीत केले. गुन्ह्याचे गंभीर स्वरुप पाहून, आरोपी शोधासाठी पोनि. अशोक एन.
लांडे स्था.गु.शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करुन, त्यांना आरोपी शोध संबंधाने सुचित केले. दरम्यान सदर आरोपी हा नांदेड येथे असल्याचे 13 नोव्हेंबर रोजी कळाल्याने त्याला नांदेड येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कामगिरी अशोक एन. लांडे
स्था.गु.शा. बुलढाणा यांचे नेतृत्वात सपोनि. रुपेश शक्करगे, पोहेकॉ. चाँद, पोना. गणेश पाटील, पोकॉ. गजानन गोरले स्थागुशा बुलढाणा यांनी केली. आरोपी शोधकामी पो.स्टे. वझीराबाद जि. नांदेड येथील पोनि. परमेश्वर कदम, सपोनि. राजू वाटाने, पोना. शरद चवरे, पोकॉ. ज्वालासिंग बावरी, पोकॉ. भाऊसाहेब राठोड यांनी महत्वाची
मदत केली आहे.