बुलढाणा (हॅलो बुलढाणा) संजय रायमुलकर यांना मेहकर -लोणारची जनता कंटाळली आहे.त्यांच्याकडेविधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कुठलाच मुद्दा राहिला नसून ते आरोप प्रत्यारोप करून माझी नाहक बदनामी करीत असून,50 खोके घेऊन गद्दारी करणाऱ्या या आमदाराचे डिपॉझिट सुद्धा गोल होणार असल्याचे सिद्धार्थ खरात म्हणाले.ते थार येथील प्रचार दौऱ्यानिमित्त बोलत होते.
लोणार मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचेआमदार संजय रायमुलकर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात आमने सामने ठाकले आहेत. सध्या सिद्धार्थ खरात यांचा प्रचार जोरात सुरू असून,संजय रायमुलकर यांचे देऊळ पाण्यात दिसून येत असल्याने,खरात यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. परंतु सिद्धार्थ खरात मंत्रालय सचिव म्हणून कार्यरत होते.त्यांच्या पाठीशी अनेक दांडगे अनुभव आहेत. त्यांनी अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविला.तब्बल 1000 दुधाळ जनावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली.शेतकऱ्यांना शेती जोडधंद्याला लावले.त्यांच्या उत्कर्ष संस्थेमार्फत अनेक सामाजिक क्षेत्रात काम केले.परंतु त्यांच्यावर संजय रायमुलकर यांनी आयात उमेदवार म्हणून आरोप केला आहे.मात्र या आरोपाचे खंडन करताना सिद्धार्थ खरात म्हणाले की,माझे काम बोलते.मी लोणार मेहकर येथील अनेक प्रश्न तत्पूर्वीच सोडविले आहेत.हे मात्र 50 कोटी घेऊन बोके झाले आहेत त्यांनी आता माझी चिंता सोडून स्वतःची चिंता करावी कारण त्यांचं डिपॉझिट गोल होणार आहे.माझ्यावर आरोप करताना ते भ्रमिष्ट दिसून येत आहेत त्यांनी पंधरा वर्षे विकास केला नाही.आता त्यांना तुल्यबळ उमेदवार मिळाल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.उपेक्षित शोषितांचे सातत्याने काम करीत आलो असून त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले केवळ ठेकेदारी केली.
आपल्या नातेवाईकांना काम दिले त्यांचे मेहुणे साले व दोन-चार चेले चपाटे यांना नियुक्त करून मोठा भ्रष्टाचार करण्यात आला हे ढोंगी ओबीसी आहेत की एस सी? हे समजायला मार्ग नाही,त्यामुळे विजय माझाच असल्याचा विश्वास सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केला आहे.