बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विधानसभा मतदारसंघातील कोल्ही गोल्हर येथे दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी शिवसेनेची भव्य प्रचार रॅली संपन्न झाली. या रॅलीत धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांना स्थानिक जनतेने ऐतिहासिक पाठिंबा दिला. हजारो ग्रामस्थ, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत संजुभाऊंना सन्मानपूर्वक स्वागत केले.
या रॅलीत शिवसेना, युवासेना, भाजप, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संजुभाऊ गायकवाड यांचा पक्षीय झेंड्यांखाली जोशपूर्ण स्वागत करण्यात आले. परिसर दुमदुमणाऱ्या घोषणांमधून आणि जनतेच्या आत्मविश्वासातून त्यांच्या विजयाचे बिगुल वाजवले गेले.
हे केवळ प्रचाराचे नव्हे, तर बुलढाण्यातील परिवर्तनाची नांदी ठरली आहे. या सभेत बुलढाण्याच्या प्रगतीचा आणि विकासाचा संकल्प ग्रामस्थांनी दृढ केला. संजुभाऊंनी प्रत्येक नागरिकाचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे, असे जनतेला पटवून दिले.
“संजुभाऊ गायकवाड – बुलढाण्याच्या प्रगतीचा खरा आधार!” या घोषणेने सभा रंगली. बुलढाण्याच्या उज्वल भविष्यासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प या रॅलीने जनमानसात ठाम केला.