देऊळगांव राजा (हॅलो बुलडाणा) राज्यातील महायुतीच्या सरकार ने दोन अडीच वर्षात जनतेसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. हे सामान्यांचे व तुमचं सरकार आहे. सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना “सुपरहिट” झाली आहे आता पुन्हा एकदा महायुती सरकारच्या हाथी सत्ता द्या शेतकऱ्यांचे कर्ज माफी करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊळगाव राजा बालाजी नगरीत सिंदखेड राजा विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रचार्थ आयोजित भव्य-दिव्य अशा जाहीर सभेत केले. या सभेला केंद्रीय आयुष्य तथा आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव,महायुतीचे उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष सिद्धीक कुरेशी, शिवसेना नेते दिपकभाऊ बोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव मोरे,सिंदखेड राजा नगर अध्यक्ष सतीष तायडे, माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. उषाताई खेडेकर,माजी नगर अध्यक्ष सुनीताताई शिंदे,रिताताई काळे,जगदीश कापसे, माजी नगरसेवक नंदनभाऊ खेडेकर,भाजपाचे प्रवीण धन्नावत, माजी नगरसेवक नंदनभाऊ खेडेकर,गोपाल व्यास,विजय उपाध्ये,बंटी सुनगत,माजी सरपंच संतोष भुतेकर,विनोद कोल्हे,सुदाम काकड,भाजपाचे संदीप मेहेत्रे,अमोल काकड, एकनाथ काकड,अनिल चित्ते, संदीप राऊत, स्वप्नील शहाणे, बालाजी मेहत्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पुढे बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी घेणारा नसून देणारा आहे मी सि.एम.म्हणजे मुख्यमंत्री नसून मी सि. एम. म्हणजे कॉमन मॅन आहे. मी सुद्धा एका शेतकरी कुटूंबातील असून मला गोर गरिबांची जाण आहे.गरिबांसाठी मोफत सिलिंडर, मोफत शिक्षण यासारख्या विविध योजना राबविल्या आहे. सिंदखेड राजा विधानसभाचे महायुतीचे अधिकृत उमदेवार डॉ. शशिकांत खेडेकर हे माजी आमदार असतांना साडे चारशे कोटी रुपयांचा निधी त्यांनी विकास कामासाठी आणला. जर तुम्ही आता त्यांना आमदार म्हणून निवडून दिले तर तो निधी साडेचारशावर पुन्हा एक शून्य वाढवून साडेचार हजार कोटी इतका होईल यासाठी भरघोस मतांनी डॉ. खेडेकर यांना निवडून द्या असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी विरोधाकावर जोरदार टिकास्त्र सोडत डॉ. खेडेकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. तर यावेळी बोलतांना महायुतीचे उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सिंदखेड राजा मतदार संघातील पंचवीस वर्षे सत्ता भोगणाऱ्या आमदाराने साखर कारखाना व सूतगिरणी बंद पाडून बेरोजगारी निर्माण करून मलिदा लाटला असल्याचे आरोप करत जोरदार टिका करत सिंदखेड राजा मतदार संघाचा पाढा वाचला. यासभेला हजारो नागरिक व महिलांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे आभार बालाजी मेहत्रे यांनी मानले.