बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बड्या नेत्यांच्या बड्या सभांचा धडाका तत्पूर्वी सुरू झाला असून आज दिग्गज नेत्यांच्या सभा आणखी विधानसभा निवडणुकीत रंग भरणार असून आवाज कुणाचा गुंजतोय?याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
बुलढाणा,मेहकर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन सुरुवात केली.त्यानंतर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मलकापूर मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभा घेतली. मेहकरात वंचितचे सुप्रीमो बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील सभा घेऊन तोफ डागली.तर आज देखील चिखलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी सभा घेत आहेत. सकाळी 11 वाजता जाफराबाद रोडवरील बोंद्रे यांच्या वीट भट्टी जवळ ही जाहीर सभा होईल.तसेच मेहकर येथे आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रचारार्थ सकाळी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत.दुपारी तीन वाजता देऊळगाव राजा येथेही डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सिंदखेड राजा येथे सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होऊ घातली आहे.