बुलढाणा (हॅलो बुलढाणा) डॉ.राजेंद्र शिंगणे हे आमदार राहीलेत, मंत्रीही राहीले. शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना प्रत्येक पद दिले, प्रत्येक वेळी प्रत्येक फंड दिला मात्र सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला नसल्याची पोलखोल गायत्री शिंगणे यांनी केली आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी म्हणजेच शिंगणे विरुद्ध शिंगणे असा सामना रंगतोय! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांची पोलखोल त्यांच्याच पुतणी अपक्ष उमेदवार गायत्री शिंगणे यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाबाई यांचे जन्मगाव असलेल्या सिंदखेड राजाला एक आगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सिंदखेड राजा शहरात जुन्या काळात बांधलेला जिजाबाईंचे वडील लखुजीराजे यांचा वाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा बारव, सजना बारव, गंगासागर, बाळसमुद्र या नावाच्या विहिरी, चांदणीतलाव, मोतीतलाव हे ऐतिहासिक जलसाठे वगैरे बघण्याजोग्या वास्तू आहेत.मात्र आमदार व मंत्रीपद आणि वेळोवेळी पद व निधी मिळाला असताना देखील डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी या
ऐतिहासिक सिंदखेड राजा मतदारसंघाचा अद्यापही विकास केलेला नाही.
डॉ. राजेंद्र शिंगणे मंत्री असताना येथे एम.बी.बी.एस कॉलेज व इतर कॉलेज व्हावे अशी अनेकांची इच्छा होती ते तेव्हा कॉलेज आणू शकले असते.शिवाय एमआयडीसीची मागणी होती परंतु तेही होऊ शकले नाही.असेही गायत्री शिंगणे म्हणाल्या.
क्रमशः