spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! शहीद कैलास पवार स्मारकाचे श्रेय कुणाचे? राहुल बोंद्रे याच्या हस्ते भूमी पूजनाने झाली होती सुरूवात… रिपाइं नेते संजय वाकोडे यांची स्पष्टोक्ती!

चिखली (हॅलो बुलडाणा) चिखली शहरातील आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते भारत पवार यांचे चिरंजीव शहीद कैलास पवार हे कर्तव्यावर असताना शहीद झाले. त्याचे स्मारकाचे काम विद्यमान नगराध्यक्षा सौ. प्रियाताई बोंद्रे यांच्या कार्यकाळात तसेच आघाडी सरकारच्या कार्यकाळात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राहूल बोंद्रे यांच्या हस्ते भूमीपूजन करून रितसर स्मारकाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, महायुतीच्या कार्यकालात विद्यमान आमदार महाले यांनी पुन्हा भूमीपूजन करून स्मारकाची पुन्हा नव्याने केलेली सुरूवात अजूनही पुर्ण झालेली नाही. याबाबत बहुजन वर्गात तिव्र नाराजी असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे विदर्भ उपाध्यक्ष संजय वाकोडे यांनी स्पष्ट केले .

आज दि. ११ नोव्हेंबर रोजी शहीद कैलास पवार स्मारकास अभिवादन करून संजय वाकोडे यांनी  सदर स्मारकाविषयी जनमानसातील खदखद बोलून दाखवली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!