spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! सैनिक कन्येने राजकारणासाठी निवडली ती देखील लढाऊ सेनाच ..! ‘जयश्रीताईंना’ म्हणूनच मिळतोय सैनिकांचा आशीर्वाद!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मातृभूमीसाठी प्राण अर्पण करण्याची तयारी ठेवतात ते सीमेवर तैनात जवान. देशप्रेमाचे खरे धडे मिळतात ते येथेच. हा वारसा जयश्रीताई शेळके यांना लाभला आहे. वडील सैन्यात असल्याने बालपण राज्याबाहेर वेगवेगळ्या तळांवर गेले. त्याग, समर्पण व प्रसंगी परिस्थिती आनुरुप संघर्ष करण्याची वृत्ती त्यांचा ठायी आली.सैन्यातील जीवन त्यांना जवळून पाहता आले ते वडील सेवानिवृत्त होईपर्यंत. आज जयश्रीताई राजकारणात आल्या आहे.बालपणी भिनलेला लढवया सैनिकांचा बाणा त्यांच्यात आजही कायम आहे. म्हणूनच त्यांनी राजकारणातील लढाऊ सेनेला अर्थात शिवसेनेला पसंती देत राजकीय एन्ट्री घेतलीय. सैनिककन्ये पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता राजकीय शिवसैनिक नेतृत्वापर्यंत आला असून सैनिक वर्गासाठी त्या ‘लेकीच्या’ ठाई आहे. म्हणूनच हजारो आजी माजी सैनिकांचे देशप्रेमी,राकट हात आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपने उभे ठाकले आहे.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई सुनील शेळके यांना सर्व समाज घटकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य गोरगरीब नागरिक , सर्व जाती धर्माचे मतदार, शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी, कामगार}, शेतकरी, मजूर , लहान मोठे व्यापारी या सर्व घटकांचे त्यांच्या उमेदवारीला समर्थन आहे. उच्च शिक्षित, शांत संयमी, विनम्र स्वभावामुळे सर्व स्तरातील मतदारांचे त्यांना पाठबळ मिळत आहे.वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याचा संगम असलेल्या आघाडीच्या कार्यक्षम उमेदवार जयश्रीताई सुनील शेळके यांच्या बद्धल हजारोंच्या संख्येत असलेल्या मतदारसंघातील शूरवीर आजी माजी सैनिक, त्यांचे परिवार आणि सैनिकी घरातील युवक युवतींना, माता भगिनीना जयश्रीताई बद्धल मनापासून आपुलकी, प्रेम ,जिव्हाळा, आपलेपण असण्याचे कारण त्यांचे सैनिक कन्या असणे हे आहे. त्यांचे वडील विजय उत्तमराव डुकरे हे लष्करी जवान होते. त्यांनी भारतीय सैन्य दलात दीर्घ सेवा दिली. देशसेवा करून 1998 मध्ये ते सेवा निवृत्त झाले.

सैनिकाची शूरवीर कन्या
एका साधारण सैनिकाची कन्या असलेल्या जयश्री ताईंचा जन्म प्रतिकूल परिस्थितीत झाला. मात्र देशभक्त सैनिकाची कन्या असल्याने त्यांच्या रक्तातच देशभक्ती, कडक शिस्त, वेळेचे महत्व, काटकपणा भिनलेला आहे. एका साध्या सैनिकाच्या घरात जन्म घेतल्याने त्यांना गरिबीची ,अडचणींची, शेतकरी जीवन गावगाड्याची जाण आहे. सैनिक परिवाराच्या सुखा दुःखाची जाणीव आहे. सैनिक असलेले वडील ज्या ठिकाणी कर्तव्यावर आहेत तिथे त्यांना राहावे लागले. त्याही परिस्थितीत स्वराज्य जनक राजमाता जिजाऊ, घटना कार बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, आध्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवराय यांना आदर्श मानणाऱ्या जयश्री ताईंनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्या उच्चशिक्षित झाल्या.

सैनिकांचा आशीर्वाद

त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील हजारो आजीमाजी सैनिकांना, त्यांच्या परिवार, त्यांचे मूलबाळ यांना जयश्री शेळके यांच्या बद्धल खास आपुलकी, जिव्हाळा आहे.एका माजी सैनिकाची तडफदार कन्या तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लढवय्या शिवसेनेची धाडसी सैनिक असलेल्या जयश्री ताई बुलढाण्याच्या रणसंग्रामात उतरल्या आहेत. भारतीय सैनिक जीवाची बाजी लावतो पण पराभूत होत नाही, त्याच जिद्द, निर्धाराने ताई मैदानात उतरल्या आहेत.लाखो मतदार प्रमाणेच हजारो भारतीय जवानांचे, त्यांच्या परिवाराचे पाठबळ, त्यांचा आशीर्वाद पाठीशी असल्याने एका सैनिकाची ही कन्या, रणरागिणी लढाई जिंकणारच हे निश्चित…

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!