पैठण (हॅलो बुलडाणा वृत्तसेवा) डॉ. सुनील शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या पैठण तालुक्यातील महत्वाचे नेते म्हणून ओळखले जाणारे डॉ. शिंदे यांनी भाजपासाठी मोठ्या प्रमाणात जनाधार तयार केला होता. त्यांनी आपल्या अथक परिश्रमातून भाजपाची विचारधारा तालुक्यातील घराघरांत पोहोचवली होती. मात्र, आता त्यांनी भाजपाला राम राम ठोकून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. सुनील शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश हा पक्षासाठी मोठा बळकटीचा धक्का मानला जात आहे. त्यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे, ज्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये देखील उत्साह आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पैठण तालुक्यात राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे स्पष्ट आहे.
हा प्रवेश समारंभ संभाजीनगर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शिवसेनेने या प्रवेशामुळे आपली ताकद वाढवण्याचे ठरवले आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत संभाजीनगर जिल्ह्यात अधिकाधिक जागांवर विजय मिळवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
डॉ. शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जातो, कारण त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भाजपाला पैठण तालुक्यात सशक्त केले होते. आता त्यांच्या शिवसेनेत सहभागी झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, ज्यामुळे येणाऱ्या काळात पैठण शिवसेनेला निश्चितच लाभ होणार आहे.
कसे होणार प्रवेश!
दरम्यान हा ऊद्या दि. १० नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षनेते डॉ. अंबादास दानवे यांच्या कार्यालयात अनौपचारिक भेट घेऊन प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे. नंतर दि. १४ नोव्हेंबर रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्यात अधिकृत प्रवेश व एखाद्या मोठ्या जबाबदारीचे पद देण्यात येणार आहे.