बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात जनतेचे विचार जाणून घेण्यासाठी एका वृत्तवाहिनीने बुलढाण्यात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आमंत्रित होते. कार्यक्रमादरम्यान वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने शिवसेना शिंदे गटाचे बुलडाणा जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांना प्रश्न विचारला, “आपको किस पर विश्वास है – महाविकास आघाडी या महायुतीके वादो पर?” यावर उत्तर देताना ओमसिंग राजपूत यांनी आश्चर्यकारकरीत्या “महाविकास आघाडीवर” विश्वास असल्याचे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे चर्चेला उधाण आले असून, सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर जिल्हाप्रमुख राजपूत यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे शिंदे गटाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.