बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भारतीय जनता पार्टीच्या बुलडाणा जिल्हा चिटणीस पदी चंद्रकांत बर्दे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांन्टे यांनी त्यांची नियुक्ती केली, तर या प्रसंगी बुलडाणा लोकसभा प्रमुख आणि माजी आमदार विजयराज शिंदे, किसान मोर्चाचे महाराष्ट्र सचिव दीपक वारे, तसेच अनंता शिंदे उपस्थित होते.
श्री. बर्दे यांनी अलीकडेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत, माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि पत्रकारितेतील अनुभवाच्या आधारे त्यांना जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर, श्री. बर्दे यांनी जिल्ह्यातील पक्ष व संघटनेच्या वाढीसाठी सक्रियपणे काम करण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हाभरातून भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.