चिखली (हॅलो बुलडाणा) जनतेच्या आशीर्वादाने मिळालेल्या पदाचा उपयोग आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी करणाऱ्या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आ. श्वेताताई महाले यांनी त्यांच्या प्रचंड विकासाकामांमधून प्रगतीचा एक नवा अध्याय लिहायला घेतला आहे. या प्रगतीचा लाभ सर्वसामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन करणारा असून त्यामुळेच चिखली मतदारसंघातील जनतेचे भरभरून आशीर्वाद श्वेताताईंना मिळणार असून याच आशीर्वादाच्या बळावर आ. श्वेताताई महाले या निवडणुकीत तब्बल ५० हजाराच्या मताधिक्याने विजयी होऊन पुन्हा विधानसभेत पोहचतील असा विश्वास चिखली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी केले. दि. ५ नोव्हेंबर रोजी शहरातील प्रभाग क्र. १२ मधील संभाजीनगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलताना केले.
महायुतीकडून उमेदवार असलेल्या आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रत्येक प्रभागात कॉर्नर बैठकांचे आयोजन केले जात आहे. या अंतर्गत दि. ६ नोव्हेंबर रोजी संभाजीनगर सहारा कॉलनी व गजानन नगरमध्ये कॉर्नर बैठक यांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांमध्ये भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेशअप्पा कबुतरे, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, ज्येष्ठ नेते एड. मंगेश व्यवहारे, रामदासभाऊ देव्हडे,
सुदर्शन भालेराव, पिरेपाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, परिपा आदी महायुतीमधील नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






Total Users : 3608318