spot_img
spot_img

गुजरात मंदिर प्रकरणी जैन समाज बांधव आक्रमक!समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी

बुलढाणा (हॅलो बुलढाणा)गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील पावागढच्या अतिप्राचीन व जैन समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या महाकाली मंदिरातील मूर्तीची विटंबना आणि या मूर्तींना क्षती पोहोचविल्याने जैन समाजबांधवांच्या भावनांना ठेस पोचली आहे. परिणामी देशभर संतापाची लाट उसळली असून, अज्ञात समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी १९ जून रोजी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

पंचमहाल जिल्ह्यातील पावागढ (गुजरात) येथे जैन समाज बांधवांचे सर्वोच्च तीर्थक्षेत्र आहे. विश्वाला शांती व सहिष्णुतेचा संदेश देणाऱ्या जैन मूर्तीला क्षती पोहोचविल्याने, मूर्तीची विटंबना केल्याने सर्वत्र रोष दिसून येत आहे. खास गोष्ट म्हणजे काली मातेची दक्षिणाभिमुख मूर्ती आहे. हे मंदिर पावागडच्या उंच टेकड्यांमध्ये सुमारे 550 मीटर उंचीवर आहे. प्राचीन गुजरातची राजधानी असलेल्या चंपानेरपासून पावागडच्या टेकड्या सुरू होतात. ‘माची हवेली’ येथे 1,471 फूट उंचीवर आहे. माची हवेलीपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रोपवेची सोय आहे. येथून मंदिरात जाण्यासाठी सुमारे 250 पायऱ्या चढून पायी जावे लागते. अशा पावन तीर्थक्षेत्री मूर्तीची विटंबना केल्यामुळे आणि मूर्ती हटविल्याने जैन समाज बांधव आक्रमक झाले आहेत. या या घटनेचा निषेध नोंदविता समाज बांधवांनी अज्ञात समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले असून निवेदनावर विजय बाफना, ललित चोप्रा, मोहित भंडारी, तेजस भंडारी, शुभम कोठारी, प्रताप कोठारी आदी समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!