मलकापूर (हॅलो बुलडाणा / रविंद्र गव्हाळे) मलकापूरचे माजी नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी आपला मलकापूर विधानसभाचे अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला असून त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश एकडे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी रावळ यांना समजूत काढून राजेश एकडे यांच्या पाठिंब्यासाठी राजी केले. त्यामुळे आता महाविकास आघाडीची एकी अधिक मजबूत झाली आहे, आणि या निर्णयामुळे निवडणुकीत आघाडीला लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे.