बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्यभरात पोलिसांची भरती सुरू झाली आहे. भरतीच्या पहिल्या दिवसात 500 उमेदवारांची मैदानी चाचणी पहाटेच घेण्यात आली.या उमेदवारांची आशा पल्लवीत झाली आहे.
खाकी वर्दी अंगावर असावी,असे अनेकांचे स्वप्न असते. आणि या स्वप्नपूर्तीसाठी आजचा तरुण वाटेल ते कष्ट उपसत असतो. त्यांचे कष्ट फळाला येणार सुद्धा! बुलढाण्यात तब्बल 133 जागांसाठी 10,236 अर्ज प्राप्त झाले आहे. मैदानी चाचणी करिता सुरुवातीच्या दोन दिवस प्रतिदिन 500 याप्रमाणे उमेदवार बोलविण्यात आले असून उर्वरित दिवशी बोलाविण्यात आलेले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पदनिहाय प्रमाणे पोलीस शिपाई- १२५ पदे ( ३८ पदे महिलाकरीता व उर्वरित ८७ पदे पुरुष सर्वसाधारण) उमेदवारांकरीता
आहे व पोलीस शिपाई (बॅण्डस्मन ) – ०८ (०२ महिला व ०६ पुरुष सर्वसाधारण) पदे
अशी एकुण १३३ रिक्त पदांची पदभरती दिनांक १९/०६/२०२४ते दि. ०३/०७/२०२४पर्यंत एकुण १३ दिवसाच्या कालावधीमध्ये शारिरीक मोजमाप चाचणी/मैदानी चाचणी / कागदपत्र पडताळणीबाबतची प्रक्रियेची कार्यवाही पोलीस कवायत मैदान, पोलीसमुख्यालय बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेली आहे.सदर पोलीस भरती मध्ये पोलीस शिपाई पदाकरीता ८५३१ व पोलीस शिपाई (बॅण्डस्मन)
पदाकरीता १७०५ असे एकुण १०२३६ आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत. मैदानी चाचणी करीता सुरुवातीचे २ दिवस प्रतिदीन ५०० या प्रमाणे उमेदवार बोलविण्यात आले असुन उर्वरित दिवशी ८०० उमेदवारांना बोलाविण्यात आलेले आहे. अ.क्र. मैदानी चाचणी दिनांक
०१ दि. १९/०६/२०२४ ते
पुरुष उमेदवार तृतीय पंथी ६८५० पोलीस शिपाई
दि. २८/०६/२०२४
उमेदवार – १०२ दि. २९/०६/२०२४ ते
महीला उमेदवार१६८१ पोलीस शिपाई दि. ०१/०७/२०२४ ०३
दि. ०२/७/२०२४ ते पुरुष उमेदवार दि. ०३/०७/२०२४
१२५६ पोलीस शिपाई
बॅण्डस्मन ०४ | दि०३/०७/२०२४ महीला उमेदवार तृतीय ४४९
पंथी ( महीला) उमेदवार ०२
-पोलीस शिपाई
बॅण्डस्मन
……………….
एकुण उमेदवारांची संख्या –
१०२३६
पोलीस शिपाई पदाकरीता शारिरीक मोजमाप चाचणी/मैदानी चाचणी दिनांक १९/०६/२०२४
ते दि. ०१/७/२०२४ पर्यंत घेण्यात येत आहे.
पोलीस शिपाई (बॅण्डस्मन) पदाकरीता शारिरीक मोजमाप चाचणी/मैदानी चाचणी दिनांक
०२/०७/२०२४ ते दि. ०३ / ७ / २०२४ या कालावधीत होणार आहे.उमेदवारांची शारीरिक मोजमाप चाचणी (छाती /उंची) व मैदानी चाचणी १०० मीटर धावणे व गोळा फेक या मैदानी चाचण्या हया पोलीस मुख्यालय बुलढाणा येथील पोलीस कवायत
मैदानावर घेण्यात येणार असुन १६०० मीटर धावणे व ८०० धावण्याची चाचणी बुलडाणा
ते धाड रोडवरील निश्चीती केलेल्या ठिकाणी घेण्यात येत आहे. सदर रस्तावरील मैदानी
चाचणी दरम्यानची पर्यायी वाहतुक व्यवस्था जिल्हा पोलीस दलाचे वतीने करण्यात आली
आहे.