बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पत्रकारितेचा व्रत जपणे सोपे काम नाही आणि त्यातच अल्पावधीत लोकप्रियतेचा कळस गाठणे म्हणजे अग्नीदिव्यच आहे.परंतु थोडक्याच वेळेत ‘हॅलो बुलढाणा’ ने लोकप्रियता प्राप्त केलीय.संपादक जितेंद्र कायस्थ यांनी कोणत्याही पक्षाशी किंवा समाजाशी भेदभाव न करता त्यांनी विश्वास संपादन केल्याने ‘हॅलो बुलढाणा’ सर्वांगीण वृत्त देणारे वेब पोर्टल बुलढाणेकरांच्या गळ्यातील ताईत बनले आहे,अशी शुभेच्छापर प्रतिक्रिया दिवाळीच्या अनुषंगाने बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा श्री. राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी दिली.
वृत्तपत्र म्हणा की न्यूज चॅनल किंवा वेब पोर्टल बातम्यांशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. अलीकडे शोधपत्रकारिता कमी झाल्याचे दुर्दैव असून अशा परिस्थितीत ‘हॅलो बुलढाणा’ अत्यंत मेहनतीने व प्रामाणिकपणे सर्वच क्षेत्रातील वृत्तांत पारदर्शी पणे प्रसारित करीत असल्याने अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे.संपादक जितेंद्र कायस्थ व त्यांची टीम आव्हानात्मक पत्रकारितेतील अग्नीदिव्य पार पाडत आहे. बातमीशी एकनिष्ठता व शोध बातमीसाठी घेण्यात येत असलेली मेहनत
‘हॅलो बुलढाणा’ची भक्कम बाजू ठरतेय.स्पर्धात्मक युगात ‘हॅलो बुलढाणा’ ने आपली तत्पर कार्यशैली टिकवून ठेवावी व पुढील वाटचाल अधिक यशस्वी करावी,अशीही शुभेच्छा भाईजींनी या दीपपर्वावर दिली आहे.














