spot_img
spot_img

💥क्राईम! चोरट्याची बिग बजेट दिवाळी! -चावी बनवून देणाऱ्या व्यवसायिकानेच फिरवली कपाटाची चावी! -कंत्राटदाराच्या कपाटातून 5 लाखांचे दागिने लंपास!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना येथील एकता नगरातील एका कंत्राटदाराच्या घरातील कपाटातून एका चाबी बनविण्याचा व्यवसाय करणाऱ्या चोरट्याने बनवाबनवी करीत तब्बल 5 लाखांच्या ऐवजावर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे.

बुलढाणा येथील एकता नगरात कंत्राटदारअजित लालचंद गुळवे राहतात. त्यांची पत्नी इंजिनिअरिंग कॉलेज चिखली येथे नोकरी असल्यामुळे त्या चिखली येथे गेल्या होत्या. कंत्राटदार अजित व त्यांच्या आई व मुलगी आणि मुलगा घरी होते.दरम्यान त्यांच्या घरासमोर एक चाबी बनविण्याचा व्यवसाय करणारा जात असताना, त्याला राजाराणी कपाटाची चावी हरविल्या असल्यामुळे चावी बनविण्याचे काम देण्यात आले होते.त्याने कपाटाची पाहणी करून चाबी बनवायला सुरुवात केली. तेव्हा सर्वच घरातील गुळवे सदस्य हजर होते. यावेळी चाबी बनविणाऱ्या चोरट्याने एक चावी गरम करून आणा असे सांगितल्याने अजित गुळवे यांनी किचन मध्ये चावी गरम करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर या चोरट्याने कपाटाच्या बाजूचा दरवाजा उघडून लॉकचे लिव्हर चेक करावे लागतील असे म्हणाला.त्याने पुन्हा कपाट चेक केले आणि कपाटाची चावी बनवून दिली व बाजूच्या कपाटामध्ये लिव्हर चेक करताना चाबी अडकल्याने मी समोरच्या माणसाची गाडी घेऊन चावी बनवून येतो असे सांगून गेला. त्यानंतर कपाट बंदच होते परंतु तो चोरटा चाबी व्यावसायिक परत आला नसल्याने अजित यांनी कपाटाच्या दरवाजामध्ये अडकलेली चाबी पीने ने काढून घेतली परंतु दरवाजा उघडून लॉकर पाहिले नव्हते.दरम्यान त्यांची पत्नी दीपांजली घरी परत आली असताना त्यांनी कपडे ठेवण्यासाठी कपाट उघडले असता त्यांच्या पत्नीला कपाटातील ठेवलेले दागिने दिसले नाही म्हणून चोरी झाल्याचे लक्षात आले.या कपाटामध्ये तब्बल 5 लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने होते ते चोरट्याने शिताफीने लंपास केले.या चोरट्याला कंत्राटदार अजित गुळवे हे चांगल्या प्रकारे ओळखतील असे त्यांनी पोलिसांना सांगितले असून याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!