वृत्तसंस्था – मुंबई (हॅलो बुलढाणा)श्री. अमोधू श्रीरंगा नायक, भाप्रसे,सह आयुक्त, राज्य कर, मुंबई यांची आयुक्त (कुटुंब कल्याण) व संचालक,
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी भाप्रसे नीमा अरोरा यांची नियुक्ती झाली आहे. निमा अरोरा यांची अकोल्यात जिल्हाधिकारी म्हणून चांगली कामगिरी राहिली.
आयुक्त (कुटुंब कल्याण) व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई या पदावर श्री.भाप्रसे धीरज कुमार होते. आता त्यांच्या जागी हे पद निवड श्रेणीत अवनत करून श्री. अमोधू श्रीरंगा नायक, भाप्रसे,सह आयुक्त, राज्य कर,
मुंबई यांची आयुक्त (कुटुंब कल्याण) व संचालक,
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
या पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी श्रीमती नीमा अरोरा, भाप्रसे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शासनाचे पत्र निर्गमित झाले. या पत्रात म्हटले आहे की, श्री नायक यांनी सध्याच्या पदाचा कार्यभार श्रीम.नीमा अरोरा, भाप्रसे यांच्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार श्री. धीरज कुमार, भाप्रसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा, असेही अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी पत्रात म्हटले आहे.
- ▪️ भाप्रसे निमा अरोरा यांच्या कामगिरीवर एक नजर
अकोला जिल्ह्यामध्ये महिला अधिकारी म्हणून रुजू झालेल्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची बदली मुंबई येथे झाली आहे. निमा अरोरा यांची सर्वप्रथम अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्यांनी अकोला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून त्यांनी महानगरपालिकेचे उत्पन्न कशा प्रकारे वाढेल तसेच अकोला शहरातील अतिक्रमणाचा सपाटा लावला होता. तसेच अकोला महानगरपालिकेतील जम्पिंग प्रमोशन विषयी त्यांनी जम्पिंग प्रमोशन कारवाई करण्याचे आदेशित केले होते. तसेच मनपातील कर्मचाऱ्यांचे पगार हे निमा अरोरा यांनी दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला देण्याचे ठरवले आणि ते दिले सुद्धा. नंतर निमा अरोरा यांना पदोन्नती देऊन त्यांना अकोला जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी जिल्ह्यातील समस्या निकाली काढून अकोल्याच्या इतिहासात नाव नोंदवले आहे.