spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! ‘बंडाचा बॉम्ब’ फोडणार घाम ! -‘विजयराज’ यांचे काय आहे ‘राज?’ देवेंद्रांना भेटून आले ते आज!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भाजपा लोकसभा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांचे रहस्यमय राजकारण अनेक जण जाणून आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात बंड पुकारत भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरला होता.पण तो आज पडताळणीत बाद झाला असला तरी, आपला अपक्ष अर्ज कायम असल्याचे ‘राज’ विजयराज यांनी ‘हॅलो बुलढाणा’कडे उकलले.दरम्यान त्यांनी आज मुंबईत देवेंद्र फडणवीसांकडे प्रत्यक्ष मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी केली.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संजय गायकवाड शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरले आहेत.आमदार गायकवाड यांचे व माजी आमदार विजयराज शिंदे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत असल्याने दोघांमध्ये नेहमी वादाच्या ठिणग्या उडत असतात. आता तर विधानसभा निवडणूक पुढ्यात असल्याने आमदार गायकवाड यांच्या विरोधात विजयराज शिंदे यांनी भाजपाकडून नामांकन अर्ज दाखल करून बॉम्ब फोडण्याचा पवित्रा घेतला आहे.शिवाय त्यांनी आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली.दरम्यान त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी रेटली आहे.ना.फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झालेली असून याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.दरम्यान आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपाचा एक अर्ज बाद झाल्याचे स्पष्ट केल्याने शिंदे यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी अपक्ष अर्ज कायम असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे विजयराज शिंदे यांच्या बंडखोरीचा बॉम्ब बुलढाणा विधानसभा मतदारसंघात फुटणार असल्याने या मतदार संघातील उमेदवारांना निश्चितच घाम फुटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!