बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखलीतील विद्यमान भाजपा आमदार यांच्या गोटाकडून मराठा योद्धा जरांगे पाटलांचे समर्थक शरद चेके यांना उमेदवारी घेऊ नये म्हणून धमक्या मिळत असल्याची पोलीस तक्रार आज 29 ऑक्टोबरला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, चिखली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदाराकडून माझ्या जिवित्वास धोका आहे त्यामुळे मला संरक्षण देण्यात यावे..मला भ्रमणध्वनी वरून व सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यमान आमदार यांच्या नावाने एका ठेकेदाराकडून व एक त्यांचा चुलत भाऊ सांगून धमक्या देत आहेत.मी मराठा कुणबी पाटील असून जरांगे पाटील यांना उमेदवारी मागित आहे.मला जरांगे पाटील यांनी उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढविणार आहे अन्यथा मी माझी राजकीय भूमिका घेणार आहे.तरी मला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी शरद चेके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे .
क्रमशः