बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मागील विधानसभा निवडणुकीत रातोरात वंचितची तिकीट घेऊन निवडणूक लढविणारे आणि निवडणुक निकालात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले बुलडाणा मतदार संघातील प्रत्येक गावात परिचित असलेले माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज बुलढाणा विधानसभा मतदार संघासाठी भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे.यावेळी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता,ते म्हणाले की विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी मागे माझ्यावर हल्ला केला. देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबण्याचे विधान केले. आमदार संजय कुटे यांच्यावर हल्ला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा त्यांनी अपशब्द वापरले.भाजपा पक्षाला त्यांनी हिजडा म्हणून संबोधले. गायकवाड यांनी मला काही कारण नसताना गद्दार म्हटले असून त्यांनी या सर्व बाबतीची माफी मागितली पाहिजे ..त्यांनी भाजपाची मदत मागितली पाहिजे त्यामुळे त्यांना भाजपाची ताकद दाखवून देण्यासाठी मी लोकसभा प्रमुख म्हणून नामांकन दाखल केले आहे.असे विजयराज शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
चिखलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना त्यांच्या बाजूला बसलेल्या माजी आमदार विजयराज शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. याबाबत ‘हॅलो बुलढाणा’ने देखील वृत्त प्रकाशित केले होते.दरम्यान आज विजयराज शिंदे यांनीबुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी भाजप पक्षाकडून आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. तीनदा आमदार होण्याचा बहुमान माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नावावर आहे.सध्या शिंदे हे भाजपा पक्षात सक्रिय असून पक्षश्रेष्ठी व इतरही नेते मंत्र्यांच्या सोबत त्यांनी सलोखा जपला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असून अनेक उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे.परंतु ऐनवेळी विजयराज शिंदे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करून या निवडणुकीत रंगत आणली आहे.परंतु पक्षाने तुम्हाला उमेदवारीसाठी परवानगी दिली आहे का या विधानावर ते म्हणाले की मी पक्षाला परवानगी मागितली आहे