बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उद्धवसेनेचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ खरात यांना मतदारांची प्रचंड पसंती असून आज ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान त्यांच्या समर्थकांनी परिसरात मोठी गर्दी केली आहे.त्यांच्या विजयाच्या घोषणा परिसरात गुंजत आहेत.
मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ खरात आज 28 ऑक्टोबरला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी ११ वाजता शिवसेना (उबाठा) संपर्क कार्यालय मेहकर येथून ते स्वतंत्र मैदान मेहकर इथपर्यंत भव्य रॅली काढण्यात येवून त्यानंतर स्वतंत्र मैदानावर जाहीर सभा आणि मग उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. दरम्यानआतापासूनच तूफान गर्दीव्हायला सुरुवात झाली असूनत्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात आहेत.














