बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सर्वच क्षेत्रात लोकप्रिय ठरलेल्या आणि उद्धव सेनेच्या अधिकृत उमेदवारी जाहीर झालेल्या माँ जिजाऊ, सावित्री, रमाईची लेक जयश्रीताई शेळके यंदा लाखोंच्या मताधिक्याने निवडून येतील असा प्रगाढ विश्वास व्यक्त करण्यात आला असून त्यांना जिंकविण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन आज एका बैठकीत करण्यात आले आहे.
आज राष्ट्रवादी भवन, बुलढाणा येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रेखाताई खेडेकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार साहेब), महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गणेशराव पाटील, विजयजी अंभोरे, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, संपर्कप्रमुख नरेंद्रजी खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदरभाऊ बुधवत, दिलीपभाऊ जाधव मा. सभापती जि. प., प्रा. संतोषभाऊ आंबेकर, राष्ट्रवादी प्रदेश सचिव संजयभाऊ गाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नरेशभाऊ शेळके, दीपकभाऊ रिंढे, बी.टी. भाऊ जाधव, पी.एम. भाऊ जाधव, लखनभाऊ गाडेकर तालुकाप्रमुख बुलढाणा, बुलढाणा विधानसभा प्रमुख डॉ. शरदभाऊ काळे, डी. एस. लहाने सर, शिवसेना तालुकाप्रमुख सुनीलभाऊ घाटे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ कोल्हे, चंदाताई बढे, आशाताई पवार, वर्षाताई इंगळे, नसीमभाई, रिजवानभाई, शैलेशभाऊ खेडकर,सोफियानभाई, सिप्पलकर भाऊ, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मतदार संघातील पहिली महिला आमदार जिंकून आणायची असून जयश्रीताईंना विधानसभेवर पाठवायचे ठरले आहे.