बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली विधानसभा मतदारसंघात विद्यमान भाजपाच्या आमदार श्वेताताई महाले यांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरले असून विजयाचा गुलाल राहुल बोंद्रे यांचाच अशी गगनभेदी घोषणा काल रात्री दुमदूमली शिवाय काँग्रेसच्या उमेदवार यादीत बोंद्रे यांचे नाव आल्याने फटाक्यांच्या आतिषबाजीत आसमंत उजळून निघाला होता.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार
राहूल बोंद्रे यांना चिखलीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या समर्थकांची काल रात्री राहुल बोंद्रे यांचे स्वागत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दी उसळली होती.फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी
जल्लोष साजरा केला.विद्यमान भाजपाच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांची लढत रंगणार असून बोंद्रे यांच्या विजयाची कार्यकर्त्यांनी जल्लोष करून विजयाची ललकारी दिल्याने यंदा गुलाल कुणावर उधळल्या जातो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.