बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मेहकर विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेची उमेदवारी कोणाला? हा प्रश्न रेंगाळत असला तरी आज या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे.
डॉ.संतोष तायडे, गोपाल बच्छीरे, प्रकाश डोंगरे आणि सिद्धार्थ खरात हे उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. सूत्रानुसार उबाठा शिवसेनेतील एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून आज पर्यंत मुंबई ते बुलढाणा – मेहकरमध्ये कार्य करणारे डॉ.संतोष तायडे अव्वलस्थानी असल्याची गुप्त माहिती आहे.
मेहकर विधानसभा मतदारसंघातील उबाठा शिवसेनेचे उमेदवार अद्यापही घोषित झाले नसल्याने
मुंबईत काही जणांनी नुकतीच मातोश्रीवर भेट दिली आहे. दरम्यान डॉ.संतोष तायडे यांचा मतदार संघातील गोतावळा व सामाजिक समीकरण पाहता आणि शिव उद्योग सहकार चे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य पाहता उमेदवारीला पसंती असल्याचे बोलल्या जात आहे.निष्ठावंत शिवसैनिक म्हणून डॉ.संतोष तायडे मूळ खामगाव येथील आहे. त्यांच्या पत्नी महसूल विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असून असंख्य महिला त्यांच्या पाठीशी आहेत. मुंबई, खामगावात आणि लोणार-मेहकर मतदारसंघात ते 25 ते 30 वर्षापासून निष्ठा पूर्वक शिवसेनेचे काम करीत आले आहेत.त्यामुळे त्यांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तायडे यांना उमेदवारी मिळाली तर मेहकर विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले डॉ.संजय रायमुलकर यांच्याशी डॉ.संतोष तायडे यांची टफ फाईट राहील असा राजकीय अंदाज आता व्यक्त होतोय! मंत्रालयात सचिव राहिलेले आणि स्वेच्छा निवृत्ती घेतलेले सिद्धार्थ खरात यांनी उद्धव ठाकरेंकडे तिकीट साठी आग्रही मागणी केलेली आहे.परंतु ऐनवेळी शिवसेनेत दाखल झालेल्यांना उमेदवारी नाकारण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शिवाय खरात यांच्यावर आमदार संजय रायमुलकर यांनी तत्पूर्वीच भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे. राणे साहेबांची बोगस सही मारणारे व दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेऊन करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सिद्धार्थ खरात यांनी केल्याचा आरोप आमदार रायमुलकर यांनी केला आहे. मेहकर मतदार संघात हॅलो बुलडाणा टीम ने सर्वे केला असता डॉक्टर संतोष तायडे यांचाच नावाची चर्चा ही सकारत्मक दिसून आली आहे