spot_img
spot_img

💥बिग ब्रेकिंग! ‘ताईपण’भारीच! जयश्रीताई शेळकेंचा आज उद्धवसेनेत प्रवेश? -बुलढाणा विधानसभेची उमेदवारी मिळणार? -विद्यमान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना निवडणूक जाणार जड!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) प्रत्येक क्षेत्रांत जयश्री ताईंचे मोठे योगदान असल्याने त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.नेमकी हीच बाब मातोश्रीवर देखील पोहोचली असून,आगामी विधानसभा निवडणुकी करिता ताईंची तिकीट फायनल असल्याची खात्रीलायक माहिती मुंबईतील सूत्रांकडून मिळत असून ताईंचा आज दुपारी 3 वाजता उबाठा शिवसेनेत प्रवेश निश्चित असल्याचे मानल्या जात आहे.दरम्यान विद्यमान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना यंदाची निवडणुक जड जाणार असल्याची चर्चा रंगत आहे.

‘हॅलो बुलढाणा’ ने कालच ‘सबसे ऊपर जयश्रीताई!’ या बातमीतून आधीच संकेत दिले होते.याच बातमीप्रमाणे काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांचे नाव आताही टॉपलाच आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री ताईंनी दिशा बचत गटाच्या माध्यमातून असंख्य उद्योगींना आर्थिक बळ दिलेच नव्हे तर हजारो महिलांचे जाळे विणले आहे.बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तब्बल 146882 महिला उमेदवार असून,महिला प्रश्नांवर आवाज बुलंद करणाऱ्या जयश्री ताईंना अनेकांची पसंती आहे.त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी ताईंना यंदाच्या निवडणुकीत जिंकून आणण्याचा संकल्प केल्याचे त्यांचे समर्थक सांगताहेत.नुकतीच जयश्रीताई शेळके यांची शिवसेनेचे सुप्रीमो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मुंबईत सकारात्मक बैठक झाली आहे.या बैठकीत आमदार धीरज लिंगाडे यांच्यासह काँग्रेसचे काही पदाधिकारी उपस्थित होते,अशी ही माहिती सूत्रांनी ‘हॅलो बुलढाणा’ला दिली आहे.परंतु हे राजकारण असून यात केव्हा कधी आणि कुणाला तिकीट मिळेल याचा भरोसा नाही. शिवसेना उबाठाची उमेदवारी मागणारे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि जयश्रीताई शेळके या तिघांपैकी तिकीट कुणाला मिळते हे अद्याप तरी जाहीर झालेले नाही.परंतु जयश्रीताई शेळके यांना तिकीट जर मिळाले तर इतर उमेदवारांना ही निवडणूक जड जाणार

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!