बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मनोज जरांगे यांनी थेट निवडणुकीत उडी घेतली असून, निवडक ठिकाणी उमेदवार उभे करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे की लढवायचे याचा निर्णय घेण्यासाठी आज अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक पार पडली. दरम्यान चिखली, खामगाव व जळगाव जामोद येथे जरांगे पाटील वादळी सभा घेणार असल्याने याचा मोठा परिणाम भाजपा उमेदवारांवर होणार असल्याची चर्चा रंगत आहे.
आज झालेल्या सभेत जिथे निवडून येतील तिथे उमेदवार द्यायचा. जिथे राखीव जागा आहेत तिथला उमेदवार आपल्या विचाराचा असेल. त्याला मतदान करावे. जिथे आपण उभा करणार नाही तिथे जो उमेदवार 500 रुपयाच्या बॉण्डवर आपल्याला समर्थन देईल त्या उमेदवाराला मतदान द्यावे, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे पिए विद्याधर महाले यांच्या मनात जरांगे विषयीचा राग असल्याचे बोलल्या जात आहे.शिवाय मराठा आरक्षणावर एकही शब्द न बोलणाऱ्या त्यांच्या पत्नी चिखली येथील आमदार श्वेता ताई महाले यांना यंदाची विधानसभा निवडणूक जड जाणार असल्याचे देखील बोलल्या जात आहे.