spot_img
spot_img

💥 ब्रेकिंग ! संत चोखासागर (खडकपूर्णा) प्रकल्पाचे 18 दरवाजे 60 सेमीने उघडले !

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव ) गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे.दरम्यान जिल्ह्यातील प्रकल्प तुंडूब झाले असून संत चोखासागर (खडकपूर्णा)

प्रकल्पाचे 18 दरवाजे 60 सेमीने उघडले आहेत.परिणामी नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असे पूर नियंत्रण कक्षाने कळविले आहे.

20 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता खडकपूर्णा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. धरणातील पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.खडक पूर्णा प्रकल्पाची आजची पाणी पातळी 520.500 इतकी आहे.आज 1421.46 घ.मी. सेमिने नदीपात्रातून विसर्ग सोडण्यात आला आहे. एकूण 18 वक्रद्वारे 60 सेमीने विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असे पूर नियंत्रण कक्षाने आवाहन केले आहे .

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!