बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पक्षांतर,बंडखोरी ला सध्या उधाण आले आहे. विशेषता मेहकर विधानसभा संघात चुरस वाढली असून आता माजी अधिकारी शरद खरात शर्यतीत आहेत.
विधानसभा 2009 पासून अनुसूचित जाती करता राखीव मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी डॉक्टर संजय रायमुलकर हे पंधरा वर्षापासून आमदार आहेत परंतु विकास कामे झाली नसल्याने मतदार नाराजी व्यक्त करीत आहेत. आणि त्याच ठिकाणी माजी अधिकारी शरद खरात हे विधानसभा लढण्याची इच्छा खरात यांची आहे.खरात यांचा दांडगा संपर्क असल्याने प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांना तिकीट मिळाल्यास वंचित कडून ते निवडणूक लढविणार आहेत. खासदार प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांचे बोलणे सुरू असून वंचित त्यांनाच मिळणार असल्याची चर्चा होत आहे .