बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची तळ्यात मळ्यातली भूमिका संपली असून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याचे संकेत मिळाले असल्याने आता सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात भाजपाला जागा सुटावी अशी पूर्वीपासूनची मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी नव्याने रेटली आहे.विशेषता भाजपा प्रवक्ते विनोद वाघ यांनी डरकाळी फोडून भाजपालाच जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे.
आमदार राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात होते.आता मात्र ते तोंड फाईलआड लपून सुप्रिया सुळे यांच्या गाडीत बसून पवार गटात सामील झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान भाजपाचे प्रवक्ते विनोद वाघ यांनी आता सिंदखेड राजा विधानसभामतदार संघाला भाजपाने जागा सुटणार असल्याचा दावा केला आहे.ते म्हणाले की गेल्या पंचवार्षिक मध्ये मित्रपक्ष शिवसेनेसाठी महायुतीचा धर्म पाळला.लोकसभेत महायुतीला मते मिळवून देऊन आमदार खासदार केले.मुख्यमंत्री ही निवडून दिला आहे.आतापर्यंत त्यांना देत आलो आहे.परंतु आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सिंदखेडराजा विधानसभेची जागा भाजपाला सोडावी लागेल अन्यथाचुकीचा निर्णय घेतल्यास पक्षश्रेष्ठी जबाबदार राहतील ,असे विनोद वाघ म्हणाले.