spot_img
spot_img

चिखलीमध्ये षडयंत्र ? हजारो लोकांची नावे मतदार यादीतून गायब करण्याचा डाव?….राहुल बोन्द्रे

चिखली (हॅलो बुलडाणा) काल संध्याकाळी राज्यभरामध्ये आचारसंहिता सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली.राज्यामध्ये आचारसंहिता सुरू झाली,आणि चिखली शहरामध्ये, चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये एक मोठा स्कॅम घडण्याचा वा घडवण्याचा डाव माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी लक्षात आणून दिला.

चिखली शहरामध्ये मागील 25- 30 वर्षापासून राहणाऱ्या व मागील अनेक निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या विशिष्ठ समाजाच्या शेकडो युवक व प्रौढ यांना,त्यांनी आपले नाव मतदार यादीतून काढून टाकण्यासंबंधी अर्ज सादर केले आहेत असे मेसेज प्राप्त झाले.मोबाईल मध्ये येणाऱ्या साध्या मॅसेज कडे दुर्लक्ष करण्याचा शक्यतो सगळ्यांचा कल असतो,तर काहीजण त्याला स्पॅम म्हणून सोडून देतात.परंतु काही लोकांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन यासंबंधी खरी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता खरोखरच त्यांच्या नावाने कुणीतरी अज्ञाताने आपले नाव निवडणूक यादीतून वगळण्यासंबंधी विनंती करत असल्याचा फॉर्म न. 7 व फॉर्म न. 8 निवडणूक आयोगाकडे ऑनलाइन भरला असल्याचे लक्षात आले.

थोडी अधिक चौकशी केली असता असे मेसेज चिखली शहरामधे शेकडो जणांना आल्याचे लक्षात आले आहे.जर चिखली शहरात शेकडो असतील तर संपूर्ण मतदारसंघात हजारो लोकांना मतदार यादीमधून वगळले जाण्याची शक्यता नाकरता येत नाही.असा संशय जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी व्यक्त केला आहे.

विशिष्ट समाजातील काही युवक, प्रौढ व स्त्रियांना अशाप्रकारे मॅसेज आल्याने यातून काही राजकीय षडयंत्र शिजत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.तरी यासंबंधी उचित चौकशी करण्यासाठी,निवडणूक निर्णय अधिकारी चिखली विधानसभा मतदारसंघ तसेच तहसीलदार चिखली व ठाणेदार चिखली पोलीस स्टेशन यांच्याकडे माजी आमदार राहुल बोन्द्रे यांचेकडून अर्ज सादर करण्यात आले आहे.

राहुल बोन्द्रे काय म्हणाले !

या सर्व संदर्भात माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी आपला मतदानाचा हक्क अबाधित राहावा,तसेच आपल्या संविधानिक लोकशाहीला व या संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्काला कोणताही कलंक लागू नये यासाठी सर्व जागरूक मतदारांनी आपल्या परिसरातील सर्व संबंधित अधिकारी वा बी.एल. ओ. यांच्याकडे जावून आपले नाव निवडणूक यादीत आहे किंवा नाही याची शहानिशा करून घ्यावी व मतदार असूनही आपले नाव नसेल तर लगेच आक्षेप घेऊन आपले नाव नोंदणी साठी अर्ज करावा,नवीन नाव नोंदणीसाठी अंतिम तारीख १९ ऑक्टोबर असल्यामुळेसर्वांनी प्राधान्यांने याबाबीकडे लक्ष द्यावे असे आवाहन जिल्ह्यातील सर्व मतदारांना केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!