12.2 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

विमा कंपनीच्या विरोधात डॉ. ज्ञानेश्वर टाले व डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार

डोणगाव (हॅलो बुलडाणा) पीकविमा काढल्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीच्या मोबदल्यात विमा कंपनीकडून अल्प भरपाई देण्यात आली. मात्र, मेहकर-लोणार तालुक्यातील अद्याप लाखोंच्या जवळपास शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई पीकविमा मिळालाच नाही. ही सरळ सरळ आर्थिक फसवणूक असल्याचा आरोप करीत डॉ. ज्ञानेश्वर टाले व डॉ ऋतुजा चव्हाण यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारींचे निवेदन देण्यात आले आहे.

गेल्या खरीप हंगामात पावसाची संततधार होती. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली, तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर शेतकरीनेते रविकांत तुपकर यांनी विमा कंपनीच्या विरोधात महाराष्ट्रभर रान पेटविले होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा उभारला होता. त्यामुळे विमा कंपनीकडून तात्पुरती काही मोजक्या शेतकरी बांधवांच्या बॅक खात्यात विमा रक्कम जमा करण्यात आली. मात्र आजही मेहकर मतदारसंघातील लाखो आसपास असलेल्या शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात विमा रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे विमा कंपनीकडून होत असलेला विलंब शेतकऱ्यांच्यासाठी त्रास दायक आहे. त्यामुळे मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांनी एल्गार पुकारात
शेतकरीनेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ज्ञानेश्वर टाले व डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या नेतृत्वात पीकविमा कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरून साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारींचे निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतर या शेतकऱ्यांच्या हितासाठी सभेत रूपांतर झाले. यावेळी पीकविमा कंपनीच्या विरोधात, देण्यात आलेल्या आक्रमक घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी डॉ. ज्ञानेश्वर टाले म्हणाले की विमा कंपनीने विनाकारण शेतकऱ्यांना उर्वरित विमा देण्यास टाळाटाळ करु नये, आता शेतकऱ्यांच्या संवेदनशीलपणेचा अंत पाहू नये, शेतकरी आज आक्रमक झाला उद्या हाच शेतकरी सत्ताधारी लोकप्रतिनिधीला गावं बंदी केली तर याला जबाबदार विमा कंपनी राहील असा निर्वाणीचा इशाराही डॉ ज्ञानेश्वर टाले यांनी यावेळी विमा कंपनीला दिला आहे. यावेळी गणेश गारोळे , सहदेव लाड , सचिन असाबे , संदीप असाबे , महेश देशमुख , नंदू जाधव , अनिल लांडगे व इतर शेकडो पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!