बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेनेकडून लढण्यास अनेक जण शर्यतीत आहेत. त्यापैकी खामगावातील डॉ. तायडे हे वलयांकित व्यक्तिमत्व ! त्यांना
शिवसेना उबाठा या पक्षाने तिकीट दिल्यास स्थानिक बहुजन कार्यकर्ते त्यांना स्वतः हुन पाठिंबा देतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केलाय.
डॉ तायडे हे खामगाव येथील रहिवासी आहेत.ते बुद्धिस्ट फिलॉसोफीचे अभ्यासक आहेत. एक दर्जेदार व्यक्तिमत्व म्हणून जिल्ह्यात ते ओळखले जातात. जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या बऱ्याच कार्यक्रमात ते व्यासपीठावर दिसतात.मेहकर विधानसभा मतदारसंघात त्यांचे 22 सरपंच निकटवर्तीय आणि समर्थक आहेत. मोठ्या प्रमाणात नाते गोते त्या परिसरात आहेत. बौद्ध समजाचे 67000 मतदार तिथं आहेत. डॉ तायडे यांना मानणारा मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे. डॉ तायडे यांना शिवसेना (उ बा ठा ) या पक्षाने तिकीट दिल्यास स्थानिक बहुजन कार्यकर्ते त्यांना स्वतः हुन पाठिंबा देतील अशी चर्चा होत आहे. त्यांना लोकनेता लोकमत पुरस्कार मिळाला त्यावेळी श्री अनुप धोत्रे खासदार,श्री अमोल जी मिटकरी आमदार, सौं दिपाली जी सय्यद सिने अभिनेत्री व्यासपिठावर उपस्थित होते.त्यांना शिवसेना उबाठाची तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.