बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सहकार महर्षी स्वर्गीय भास्कर रावजी शिंगणे यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हाभरातील त्यांच्या आप्तेष्टांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली.या स्मृतिदिनानिमित्त बोलताना कुमारी गायत्री गणेश शिंगणे यांनी स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
आमचे आजोबा स्वर्गवासी झाले त्यावेळेस जरी मी खूप लहान होते, तरी त्यांच्या जाण्यानंतर अनेक वर्ष झाल्यानंतरही त्यांच्या दातृत्वाचे व त्यांच्या कर्तुत्वाचे गोडवे गायले जातात.सहकाराची गंगा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणून विकास सुरू करण्यात आणि हजारो कुटुंबाला या सहकाराचा फायदा मिळवून देण्यासाठी आमच्या आजोबांनी जे काही प्रयत्न केले त्यामुळेच आजही “सहकारमहर्षी” हे नाव स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे यांच्या सोबत जोडले जाते.सहकाराच्या वटवृक्ष असलेल्या स्व. शिंगणे साहेब यांच्या कर्तृत्वामुळे हजारो कुटुंबाच्या जीवनाचे सोने झाले.त्यांच्या या विचाराचा व त्यांच्या कर्तुत्वाचा हा वारसा सिंदखेडराजा मतदारसंघात दुर्दैवाने जतन करण्यास त्यांच्याएवढा दूरदर्शी माणूस आपल्याला लाभला नाही.परंतु त्यांच्या विचाराची, त्यांच्या कार्याची ही ज्योत तेवत ठेवण्याचे भाग्य मला मला लाभले असून, स्व. भास्कर रावजी शिंगणे यांच्या विचारांचा हा समर्थ वारसा मी आणि माझा भाऊ गौरव आम्ही प्राणपणाने पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे गायत्री शिंगणे म्हणाल्या.